जेजुरीत गाढवांना लाखाचा भाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीत गाढवांना लाखाचा भाव!
जेजुरीत गाढवांना लाखाचा भाव!

जेजुरीत गाढवांना लाखाचा भाव!

sakal_logo
By

जेजुरी, ता. ५ : जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला होता. राज्यभरातून भटक्या जमातीचे बांधव गाढवांच्या खरेदी विक्रीसाठी जेजुरीत आले होते. वाढती महागाई व जनावरांची संख्या कमी झाल्याने बाजारात यंदा गाढवांच्या किमती दुप्पट दराने वाढल्या होत्या. पंचवीस हजारांपासून एक लाखापर्यंत गाढवांना बाजार मिळत होता.
जेजुरीत दरवर्षी पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला होता. महाराष्ट्रात चार ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. त्यामध्ये जेजुरीचा बाजाराचा बाजारही महत्त्वाचा असतो. दोन दिवसापासून जेजुरीत व्यापारी दाखल होत आहेत. पौर्णिमेपासून तीन दिवस हा बाजार भरतो. बाजारात यंदा गाढवांची संख्या कमी जाणवली. त्यामुळे बाजार चढे राहिले.
दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होत असल्याने व वाढत्या महागाईमुळे गाढवांच्या किमती वाढल्याचे खंडू जाधव यांनी सांगितले. यंदा गाढवांच्या किमती लाखावर गेल्याचे अनेक व्यवहार पाहण्यास मिळत होते. गाढवाच्या दातावरून व वयावरून त्याची किंमत ठरविली जाते. कामासाठी काटक व दणकट गाढवांना विशेष मागणी असते. यंदा गुजरात येथील काठेवाड दोनशेच्या आसपास गाढवे बाजारात आली होती. तर, महाराष्ट्रातील व्यापारी गाढवे घेऊन आली होती. सुमारे दीड हजाराच्या आसपास गाढवांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले.
यांत्रिक युगातही गाढवांचे महत्त्व टिकून आहे. अडचणी ठिकाणी, डोंगरात व गल्लीबोळातून आजही गाढवांच्याद्वारे वाहतूक केली जाते. विटभट्टीसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
दिवसेंदिवस जनावरांची संख्या कमी होऊ लागल्याने गाढवांच्या किमती वाढू लागल्या आहेत. यंदा दुप्पट दराने गाढवांची विक्री झाल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र, बाजारतळावर यंदा पुरेशा सुविधा मिळाली नसल्याची खंत खंडू जाध यांनी व्यक्त केली. वीज व पाण्याची सोय तळावर व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत जणू भटक्या जमाती बांधवांचा मेळावाच भरतो. महाराष्ट्रातून आलेले भटक्या जमातीतील बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा देत होते. खंडोबाच्या दर्शनसाठी बांधव मोठ्या संख्येने जाताना दिसत होते.