जेजुरीच्या विकासाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीच्या विकासाला गती
जेजुरीच्या विकासाला गती

जेजुरीच्या विकासाला गती

sakal_logo
By

जेजुरीच्या विकासाला गती

- वीणा सोनवणे, माजी नगराध्यक्षा, जेजुरी (ता. पुरंदर)

पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. येथे राज्यभरातून दररोज भाविक येत असतात. लागूनच असलेल्या औद्योगिक वसाहतीमुळे जेजुरी झपाट्याने वाढत आहे. परिसरात नव्याने उद्योग व्यवसायांची भर पडू लागलेली आहे. साहजिकच येथील नागरिकांच्या सोयी सुविधांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्या पुरविण्यासाठी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीच्या विकासाला गेली पाच वर्षापासून विशेष गती आली आहे.
जेजुरी नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जेजुरीकरांनी पुरंदरचे युवा नेतृत्व आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत परिवर्तन करून काँग्रेसला सत्ता दिली. येथील जनतेने आमदार संजय जगताप यांच्या निवडीला प्रतिसाद देऊन माझ्यासारख्या एका गृहिणीला नगराध्यक्षपद भूषावण्याची संधी दिली. जेजुरी नगरपालिकेची सूत्रे हातात आल्यानंतर जेजुरी शहर आणि परिसरातील विकासकामांचा खऱ्या अर्थाने वेग आला.
दरम्यान, विरोधकांनी नगराध्यक्षपदाला आव्हान देत वर्षभर पालिकेचा कारभार ठप्प ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, खंडेरायाचा आशीर्वादामुळे आमदार संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळाली. त्यानंतर जेजुरी नगरपालिकेचा कारभार जोमाने सुरू झाला. यात नव्याने म्हाळसादेवींच्या नावाने भाजीमंडई उभारली, अनेक वर्ष खड्ड्यात असलेला धालेवाडी रस्ता हा सिमेंटचा बनवला व आजही तो सुस्थितीत आहे. जेजुरी शहरात अनेक रस्ते नव्याने बनवले. तसेच, जेजुरीचे सर्वच ऐतिहासिक तलावांचे सुशोभीकरण केले. जुना पालखीतळ येथे शाहीर सगनभाऊंच्या नावाने प्रशस्त असे भव्य व्यासपीठ बनवले. तेथे ओपन जिम तयार केली. पेव्हींग ब्लॅागचा जॅागिंग ट्रॅक बनवला. आज याठिकाणी जेजुरी शहरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणावर सकाळ संध्याकाळ जॅागिंगसाठी येतात.
आज आम्ही या गोष्टी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करू शकलो व याचा उपयोग जेजुरीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात, याचे आम्हाला समाधान वाटते. आमदार संजयजी जगताप यांच्या प्रयत्नातून आज जेजुरी शहरात प्रथमच भव्य असे मल्हार नाट्यगृह तयार होत आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे व लवकरच जेजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य असा पुतळा बसवण्यात येणार आहे. नुकताच आम्ही सर्वांनी आमदार साहेबांसोबत जाऊन पुतळ्याची पाहणी केली आणि तो महाराजांचा भव्यदिव्य पुतळा पाहून अभिमान वाटला. जेजुरीतील पुढील अनेक पिढ्यांना संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याची उभारणी लवकरच करणार आहोत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्काम तळासाठी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे कायमस्वरूपी पालखी तळ मिळाला. जेजुरी शहरालगत मिळालेल्या नऊ एकर जागेमुळे पालखीच्या मुक्कामाची सोय तर होणार आहे, परंतु जेजुरीकरांना वर्षभर विविध उपक्रमासाठी हा तळ वापरता येणार आहे. लवकरच या तळाचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत असे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व आम्हा जेजुरीकरांना लाभले. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून आमदार संजय जगताप यांच्याकडे पाहिले जाते. जेजुरीच्या समस्येबाबत ते कायम मार्ग काढून नवीन योजना राबवीत असतात. आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी शहराचा विकासाला गती मिळत राहावी, हीच सदिच्छा व आमदार साहेबांना निरोगी व उदंड आयुष्य लाभावे, हीच खंडेरायाचरणी प्रार्थना!