सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान संजय सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान
संजय सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान
सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान संजय सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान

सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान संजय सावंत यांचा जीवनगौरवने सन्मान

sakal_logo
By

जेजुरी, ता. ११ : येथे (ता. पुरंदर) पुणे जिल्हा वृध्द कलावंत व साहित्यिक शासकीय मानधन समितीचे सदस्य तसेच दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर व उद्योजक संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या हस्ते संजय सावंत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आमदार संजय जगताप मित्रपरिवार आणि कडेपठार सोशल क्लबच्या वतीने जेजुरी येथील जिजामाता विद्यालय व कडेपठार सोशल क्लब यांच्यावतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सावंत प्रतिष्ठानच्या वतीने ६१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संजय सावंत यांनी गेली पंचवीस वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहेत. मुलांना शालेय साहित्य, दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या बांधून देणे आदी उपक्रम राबविले आहेत. तसेच कलावंत मानधन समितीच्या माध्यमातून सुमारे दीडशे ज्येष्ठ कलावंताना मानधन मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्याबद्दल सावंत यांना हा पुरस्कार प्रदान केल्याचे प्रा.सागर यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, उद्योजक रवींद्र जोशी, माजी उपनगराध्यक्ष रमेश बयास, देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राऊत, प्रकाश खाडे, प्रल्हाद गिरमे, अनिकेत हरपले, विक्रम माळवदकर, सुरेखा सावंत, सर्जेराव सावंत आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन वर्षा देसाई यांनी तर आभार मुख्याध्यापिका गायत्री बल्लाळ यांनी मानले.

01775