जेजुरी येथे पाच जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरी येथे पाच जणांवर 
तलवार, कोयत्याने हल्ला
जेजुरी येथे पाच जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला

जेजुरी येथे पाच जणांवर तलवार, कोयत्याने हल्ला

sakal_logo
By

जेजुरी, ता. २४ : जेजुरी (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाच ते सहा जणांवर कोयता व तलवारीने वार केले. यामध्ये पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी फरारी आहेत.
जेजुरी नगरपरिषद पुढील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास काही जणांनी पाच ते सहा जणांवर कोयता व तलवारीने वार केले. त्यातील तीन जखमींना पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे येथील नेते गौतम भीमराव भालेराव (वय ३९), म्हाळसाकांत भीमराव भालेराव (वय ३०), विजय एकनाथ भालेराव (वय ४३), सिद्धांत विजय भालेराव (वय १७), आदित्य खंडेराव भालेराव (वय २१), हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तीन जणांना पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट देत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जाबजबाब घेण्याचे काम सुरू केले
असून, फरारी आरोपींचा शोध सुरू आहे.