जेजुरी येथील जानाईदेवीच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

जेजुरी येथील जानाईदेवीच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

जेजुरी, ता.२६ : खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाईदेवीच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात येत आहे. गेली तीन वर्षात तीन कोटी रुपये खर्चाचे काम लोकसहभागातून करण्यात आले आहे.उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून बांधकामासाठी आर्थिक मदतीचे आवाहन मंदिर बांधकाम समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
जेजुरी शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या ऐतिहासिक होळकर तलवाच्या शेजारी जानाई देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या शेजारी पुष्करणी आहे. या पुष्करणीला जानाईतीर्थ असे नाव आहे. श्री खंडोबा आणि बनाई यांचा विवाह झाल्यानंतर म्हाळसादेवी क्रोधीत होऊन देवीने जलरूप घेवून गंगेत विलीन झाली व तप सुरू केला.
जानाई देवीचे मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ मंडळाने चार वर्षापूर्वी नवीन भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. ६५० चौरस मीटर जागेत साडे आठ
हजार स्केअर फूट बांधकाम सुरु करण्यात आले. कोल्हापूर आणि पणदरे येथून घोटीव दगड आणून राज्यस्थानच्या कारागिरांकडून अतिशय सुबक
कलाकुसरीचे काम स्थापत्यविशारद प्रशांत नाझरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या कामासाठी जेजुरीकर ग्रामस्थ जेजुरी
देवसंस्थान,भाविक यांच्या लोकसहभागातून आत्ता पर्यंत तीन कोटी रुपये खर्चून सुमारे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.
उर्वरित कामासाठी आर्थिक मदतीची आवशक्यता असून ग्रामस्थ, भाविक व विविध संघटनांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी अप्पासाहेब बारभाई, रामचंद्र अप्पा भापकर, माणिक पवार, पंडित हरपळे, नारायण आगलावे आदींनी केले आहे.

01826

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com