जेजुरी शहरात भरदिवसा घरफोडी

जेजुरी शहरात भरदिवसा घरफोडी

जेजुरी, ता. २३ : जेजुरी (ता. पुरंदर) शहरातील विद्यानगर परिसरातील ॲड. धनंजय ज्ञानेश्‍वर भोईटे यांच्या घराचे व कपाटांचे कोयंडे तोडून चोरट्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये रोख व चाळीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरून नेले. सोमवारी (ता. २२) सकाळी नऊ ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली.
याबाबत जेजुरी पोलिसांनी माहिती दिली की, जेजुरी विद्यानगर परिसरात जुन्या पालखी मैदानासमोर ॲड. धनंजय भोईटे यांचे निवासस्थान आहे. शिक्षणा व व्यवसायानिमित्त यांचे कुटुंब पुणे येथे राहतात. तर, ॲड. भोईटे जेजुरीतून पुण्याला येऊन-जाऊन करतात. सकाळी ९ वाजता ते जेजुरीतून सासवड न्यायालयात गेले. सकाळी नऊ ते दुपारी एकच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी गेटवरून घरात प्रवेश करून लोखंडी सेफ्टी डोर, दोन लाकडी दरवाजे यांचे कुलूप कोयंडे तोडून बेडरूममधील दोन लाकडी कपाटांचे लॉक तोडून कपाटातील एक लाख ऐंशी हजार रुपये, तसेच पायातील पैंजण, ब्रेसलेट आदी २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी चोरीबाबत त्यांना माहिती दिली.
दरम्यान, दोघे चोरटे पल्सर दुचाकीवर निघून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com