जुन्नर येथे काल्याचे कीर्तन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर येथे काल्याचे कीर्तन
जुन्नर येथे काल्याचे कीर्तन

जुन्नर येथे काल्याचे कीर्तन

sakal_logo
By

जुन्नर, ता. ३० : येथील कुंभारआळी-जुन्नर येथे मळगंगामाता वार्षिक यात्रोत्सव व संत श्री गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. यानिमित्त सलग पाच दिवस अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे यांनी दिली.
अखंड हरीनाम सप्ताहात मंचर येथील युवा प्रबोधनकार प्रांजली सोमवंशी, युवा कीर्तनकार दर्शन कबाडी, श्याम सोनवणे आदींनी कीर्तनसेवा सादर केली. विशाल फलके यांचे काल्याचे कीर्तन झाले.
या प्रसंगी सलग पाच दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी उमेश शिंदे, सुरेश शिंदे, दत्तात्रेय हिवरेकर, नीलेश शिंदे, सागर शिंदे, स्वप्नील हिवरेकर, केरभाऊ शिंदे, संदीप शिंदे, विकास हिवरेकर, विलास शिंदे, गोरक्ष दगडू शिंदे, संतोष शिंदे आणि जुन्नर शहर कुंभार समाजाचे सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03224 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top