
गोळेगावच्या बिडवई यांना कृषिभूषण पुरस्कार
जुन्नर, ता. ६ : गोळेगाव (ता. जुन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी जितेंद्र चंद्रकांत बिडवई यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (२०१९) प्रदान करण्यात आला. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तसेच कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या उपस्थितीत सपत्निक सन्मानित करण्यात आले.
बिडवई यांना यापूर्वी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी गोळेगावला बळीराजा कृषी मंडळाची स्थापना करून कृषी मेळावे, कृषी प्रदर्शन, शेतकरी अभ्यास दौरा, द्राक्ष महोत्सव, शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री आदी शेतीविषयक उपक्रम राबविले. याबरोबर शेतकऱ्यांसाठी कीटकनाशकांचा सुरक्षित वापर अभियान राबवून मोफत सुरक्षा किटचे वाटप केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.
नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार स्वीकारताना जितेंद्र बिडवई.
jun30p01
Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03230 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..