
चित्ररथातून सर्वधर्मसमभावाचा संदेश
जुन्नर, ता. ४ : येथील शिवाई देवी यात्रेत जुन्नरच्या तनिष्का व्यासपीठाने केलेला सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
शिवाई देवीच्या पालखी व छबिना मिरवणुकीत हा चित्ररथ तुळजाभवानी महिला प्रतिष्ठान व शिवाईदेवी यात्रा कमिटीच्या सहकार्याने सादर केला होता. भारत माता व सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे फ्लेक्स ट्रॉलीला लावण्यात आले होते. भक्ती परदेशी, नीरज गीते, ज्ञानेश्वरी लोखंडे, अर्णव लोखंडे, प्रणिता वारे या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून हा चित्ररथ साकार केला.
‘तनिष्का’च्या गटनेत्या उज्ज्वला शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूनम तांबे, सरिता कलढोणे, मनीषा खेडकर, कांचन वाडकर, स्नेहा साळवे, ऊर्मिला थोरवे, विजय प्रजापती यांनी चित्ररथ तयार करण्यासाठी परिश्रम घेतले. या मिरवणुकीत कविता छाजेड, डॉ. वैशाली गायकवाड, महानंदा हिरेमठ, माधुरी म्हसकर, राधिका कोल्हे, सुनीता वामन, अनिता काजळे, मनीषा काळे, वनमाला लोणकर, वैशाली संत, छाया वाळुंज, संध्या खंडागळे या तनिष्का सहभागी झाल्या होत्या.
चित्ररथाचे नागरिकांनी कौतुक
भारत हा विविध जातीधर्माचा देश आहे. प्रत्येक धर्म मानवता शिकवतो. धर्माच्या नावाखाली काही समाजकंटक लोक देशाला अडचणीत आणू पाहतात. त्यामुळे समस्त मानवजातीचे नुकसान होते. त्यामुळे सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे नागरिकांनी कौतुक झाले.
PNE22S62385
Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03232 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..