माती उत्खनन रोखणाऱ्या पोलिस पाटलास मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माती उत्खनन रोखणाऱ्या 
पोलिस पाटलास मारहाण
माती उत्खनन रोखणाऱ्या पोलिस पाटलास मारहाण

माती उत्खनन रोखणाऱ्या पोलिस पाटलास मारहाण

sakal_logo
By

जुन्नर, ता. ४ : आदिवासी भागातील चिंचेचीवाडी (ता. जुन्नर) येथील अवैध मातीचे उत्खनन व वाहतूक थांबविण्यास गेलेले पोलिस पाटील तानाजी सोनू केदारी यांना मारहाण करणाऱ्या देवळे (ता. जुन्नर) येथील चौघांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस पाटील शशिकला दिगंबर बोऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वालू धुंदा शेळके, रामदास गेनू घुटे, ज्ञानेश्वर काशिनाथ घुटे, किसन ढवळा घुटे यांच्याविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याचा कारणावरून गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
तलाठी नामदेव तळपे यांनी बोऱ्हाडे यांना सोमवारी (ता. २) रात्री फोन करून माती उत्खनन थांबविण्यास सांगितले. त्यानुसार त्या मुलांसोबत दुचाकीवरून घटनास्थळी आल्या. त्यांनी खैरे गावचे पोलिस पाटील तानाजी सोनू केदारी व अंजनावळे गावच्या गणुबाई नामदेव लांडे यांना बरोबर घेतले. यावेळी घटनास्थळी एक जेसीबी होता. फिर्यादीने जेसीबी मशिन व दोन मातीने भरलेले हायवा ट्रक (क्र. एमएच १४ डीएम ३४११ व एमएच १२ एसएफ ७८५१) उभे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना जमीन मालक ज्ञानेश्वर काशिनाथ घुटे यांना, ‘उत्खनन परवाना काढला आहे का? मला तलाठी नामदेव दळवी यांनी पाठविले आहे. तुम्ही काम बंद करा,’ असे सांगितले. त्यावर आरोपींनी पोलिस पाटील तानाजी केदारी यांना, ‘तू आमच्या गावचा पोलिस पाटील नाही, तुझा इथे यायचा काय संबंध?’ असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03234 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top