जुन्नर खरीप हंगाम आढावा बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर खरीप हंगाम आढावा बैठक
जुन्नर खरीप हंगाम आढावा बैठक

जुन्नर खरीप हंगाम आढावा बैठक

sakal_logo
By

ट्रॅक्टर, रोटावेटर अवजारांचे
जुन्नरमध्ये शेतकऱ्यांना वाटप

जुन्नर, ता.९ : ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाने तालुक्यात फळबाग लागवड, गांडूळ खत युनिट, विहीर पुनर्भरण, शेततळे आदी योजना मोठ्या प्रमाणात राबवाव्यात, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी येथे केले.
कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना व कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेतील सोडत पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ट्रॅक्टर व रोटावेटर अवजारांचे वाटप आमदार बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुका कृषी विभागाच्या वतीने पंचायत समितीमध्ये खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. माजी सभापती विशाल तांबे, बाजीराव ढोले, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व कृषी विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेती शाळेतून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, असे शरद लेंडे यांनी यावेळी सांगितले. कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी प्रास्ताविक केले. कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सूत्रसंचालन केले.

03784

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03236 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top