जुन्नर येथील अपघातात पती ठार, पत्नी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर येथील अपघातात
पती ठार, पत्नी जखमी
जुन्नर येथील अपघातात पती ठार, पत्नी जखमी

जुन्नर येथील अपघातात पती ठार, पत्नी जखमी

sakal_logo
By

जुन्नर, ता. ६ : नारायणगाव-जुन्नर रस्त्यावर गुरुवारी (ता. ५) रात्री मोटारीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार नवनाथ गजानन मिंढे यांचा मृत्यू झाला; तर त्यांची पत्नी सुनंदा या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिंढे पती-पत्नी आपल्या मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच १४ डीआर ८३४१) जुन्नरला येत असताना पाठीमागून भरधाव येत असलेल्या इंडिका मोटारीची (क्रमांक एमएच १५ सीएम ४२१४) त्यांच्या मोटारसायकलीस जोराची धडक बसली. त्यात नवनाथ मिंढे यांचा मृत्यू झाला; तर सुनंदा या गंभीर जखमी झाल्या. याबाबत बाळासाहेब मिंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील अशोक चिखले (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03237 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top