
ध्वनिक्षेपकाविना पहाटेची अजान
जुन्नर, ता. ६ : जुन्नर उपविभागातील सर्व मशिदीतून पहाटेची अजान ध्वनिक्षेपकाविना देण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनिक्षेपक बंद राहतील, तर सकाळी सहा ते रात्री दहा पर्यत नियम व अटीनुसार सुरू राहतील. या आदेशाचे पालन करण्याची ग्वाही संबंधितांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुन्नर उपविभागात जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा या चार पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या मशीद, चर्च व मंदिरांच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नियमांचे पालन करत जुन्नर उपविभागातील सर्व मशिदीत पहाटेची अजान ध्वनिक्षेपकाविना देण्यात येत आहे. अन्य धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
सलोखा राखण्याचे आवाहन
जुन्नर उपविभागातील एकूण ५४ मशीद, ४३ मंदिर व एक चर्च, या धार्मिकस्थळांना पुढील सहा महिन्यांसाठी ध्वनिक्षेपकाचा परवाना दिला आहे. उर्वरित सर्व धार्मिकस्थळांना ध्वनिक्षेपकाचा परवाना घेण्याविषयी सूचना केल्या आहेत. तालुक्यातील सर्व धार्मिकस्थळांचे व्यवस्थापनाने देखील प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करून सर्वधर्मीय सामाजिक सलोखा टिकविण्याचे ग्वाही दिली आहे. पोलिस प्रशासनाचे आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नियमांचे पालन करण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यात जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
ध्वनिक्षेपक परवाना दिलेली धार्मिकस्थळे
मशीद- ५४
मंदिर- ४३
चर्चा- १
Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03238 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..