बादशाह तलाव भागात गतिरोधकाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बादशाह तलाव भागात 
गतिरोधकाची मागणी
बादशाह तलाव भागात गतिरोधकाची मागणी

बादशाह तलाव भागात गतिरोधकाची मागणी

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : जुन्नर - नारायणगाव रस्त्यावरील आगर- खोरेवस्ती ते बादशाह तलाव या भागात सातत्याने अपघात होत असून गेल्या काही दिवसात तीन ते चार निरपराधांना आपला जीव गमवावा लागला तर काहीजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याची गरज असून वाहन चालकांना सावध करणारे सूचना फलक लावण्याची आवश्यकता असल्याचे भाजपच्या जुन्नर शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश परदेशी यांनी सांगितले.
या मार्गावर वळण, तीव्र उतार, अपघात क्षेत्र, पूल, रस्त्याच्या कडेला इंडिकेटर आदी बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाने करण्याची आवश्यकता आहे. येत्या १५ दिवसांत फलक न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03242 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top