‘शब्दांच्या गाभाऱ्यात’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शब्दांच्या गाभाऱ्यात’ 
काव्यसंग्रहाचे प्रकाशन
‘शब्दांच्या गाभाऱ्यात’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘शब्दांच्या गाभाऱ्यात’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : तनिष्का सरिता म्हेत्रे-कलढोणे यांच्या ‘शब्दांच्या गाभाऱ्यात’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी-गीतकार हनुमंत चांदगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. ८) जुन्नर येथे झाले.
यावेळी यशोदीप प्रकाशनच्या प्रकाशिका रूपाली अवचरे, रयतेचा कैवारी काव्यांकाचे कार्यकारी संपादक मिटूटू आंधळे, शिवांजली साहित्यपीठाचे शिवाजी चाळक, जुन्नरी साहित्यिक समूहाचे संस्थापक एकनाथ रावळ, तनिष्का गट प्रमुख उज्ज्वला शेवाळे, कवी व सुलेखनकार उमेश शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी हनुमंत चांदगुडे म्हणाले, ‘‘श्रीमंती ही पैशात मोजली जाते, पण शब्दाने श्रीमंत झालेली कवी-लेखक मंडळी ही खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात.’’ कार्यक्रमाचे संयोजन अजय कलढोणे यांनी केले. कवी संदीप वाघोले यांनी सूत्रसंचालन केले. समृद्धी कलढोणे यांनी आभार मानले.
PNE22S63232

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03243 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top