यात्रेत नाचू न दिल्यामुळे माजी सरपंचाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यात्रेत नाचू न दिल्यामुळे  
माजी सरपंचाला मारहाण
यात्रेत नाचू न दिल्यामुळे माजी सरपंचाला मारहाण

यात्रेत नाचू न दिल्यामुळे माजी सरपंचाला मारहाण

sakal_logo
By

जुन्नर, ता. १० : यात्रेच्या कार्यक्रमात नाचू दिले नाही म्हणून देवळे (ता. जुन्नर) येथील माजी सरपंचास रस्त्यात अडवून, ‘तू सरपंच आहेस म्हणून यात्रा काय तुझ्या बापाची आहे का?’ अशी विचारणा करून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. याप्रकरणी तेरा जणांविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबतची फिर्याद माजी सरपंच छगन गेनू घुटे यांनी दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तान्हाजी बोऱ्हाडे, लहू बोऱ्हाडे, होना बोऱ्हाडे, विनायक बोऱ्हाडे, तुकाराम बोऱ्हाडे, रोहित बोऱ्हाडे, ओंकार बोऱ्हाडे, आविष्कार बोऱ्हाडे, हेमा बोऱ्हाडे, ममता बोऱ्हाडे, धनश्री बोऱ्हाडे, जानकू बोऱ्हाडे व पांडू बोऱ्हाडे (सर्व रा. शिवतेचीवाडी-देवळे, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
मारहाणीची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी घडली. मात्र, फिर्यादी घुटे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर सोमवारी (ता. ९) त्यांनी जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. बेकायदा जमाव जमून आरोपींनी घुटे यांना लोखंडी फायटर, सळई व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

विनयभंगाची फिर्याद
दरम्यान, माजी सरपंच छगन घुटे यांनी १३ एप्रिल रोजी दुपारी घरात कोणी नाही, असे पाहून विनयभंग केल्याची फिर्याद देवळे येथील तरुणीने पोलिसांकडे सोमवारी (ता. ९) दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03244 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top