मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार
मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार

मीना खोऱ्याचा पाणी प्रश्‍न सुटणार

sakal_logo
By

जुन्नर, ता. ११ : वडज उपसा सिंचन योजनेच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी दिल्याने मीना खोऱ्याचा पाणी प्रश्न सुटण्याची आशा निर्माण झाली असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सुरेश शेणकर व सचिव प्रशांत पाबळे यांनी सांगितले.
या मागणीचा गेली सुमारे २८ वर्षांपासून मीना खोरे संघर्ष कृती समिती पाठपुरावा करत आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या काळात हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला. या कामाचे सर्वेक्षणासाठी ९ लाख ७२ हजार रुपये निधी मंजूर झाला, मात्र ठेकेदाराकडून काम झाले नाही, यामुळे प्रश्न रेंगाळत पडला.
आमदार अतुल बेनके यांनी कृती समितीला पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यासमवेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु शासन दरबारी काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून साखळी उपोषण सुरु करण्याचे ठरविले होते. आमदार बेनके यांनी याची दखल घेतल्याने आंदोलन काही काळ स्थगित केले होते, असे शेणकर व पाबळे यांनी सांगितले.
वडज उपसा सिंचन योजनेअंतर्गत विठ्ठलवाडी, धोंडकरवाडी, काचळवाडी, निळोबारायनगर, पाबळवाडी, खिलारवाडी, सावरगाव या गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाणी योजनेच्या सर्वेक्षण कामासाठी नुकतीच मंजुरी मिळाली. त्यासाठी कृती समिती व आमदार बेनके यांनी जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी या योजनेच्या सर्वेक्षण कामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या सर्वेक्षण कामाला गती देऊन लवकरच या उपसा सिंचन योजनेचे काम हाती घेणार आहे. या भागातील शेतीला पाणी मिळावे, यासाठी आम्ही करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले. लवकरच योजेनेचा सर्व्हे करून हा प्रकल्प मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- अतुल बेनके, आमदार

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03246 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top