जुन्नरमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित
जुन्नरमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित

जुन्नरमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित

sakal_logo
By

जुन्नर, ता. ११ : दत्ता म्हसकर जुन्नर नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या निवडणुकीत प्रथमच भाजप सर्व जागा स्वतंत्रपणे जागा लढविणार असल्याचे चित्र आहे, तर महाविकास आघाडी होणार की घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार, याची उत्सुकता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार प्रभाग रचनेवर मंगळवार (ता. १०) ते शनिवारपर्यंत (ता. १४) नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. या कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी २३ मेपर्यंत होणार असून, अंतिम प्रभाग रचना सात जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नगरपालिकांची सन २०२२ ची निवडणूक दोन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. नवीन प्रभाग रचनेत पालिकेच्या सदस्यांची संख्येत वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या २ नोव्हेंबर २०२१ च्या अध्यादेशानुसार ‘क’ वर्गासाठी सदस्य संख्येत तीनने वाढ केली आहे. तसेच, किमान संख्या २० व २५ पेक्षा अधिक नसावी, असे नमूद केले आहे. जुन्नरची २०११ ची लोकसंख्या २५ हजार ३१५ इतकी आहे. ती गृहीत धरून प्रभाग रचना केली आहे.

नगरसेवक संख्येत तीनने वाढ
नगरसेवकांची संख्या नव्या रचनेनुसार १७ वरून २० झाली आहे. प्रत्येक प्रभागात दोन सदस्यांप्रमाणे दहा प्रभागांत २० सदस्य आगामी रचनेत असतील. प्रत्येक प्रभाग सुमारे २ हजार ५०० लोकसंख्येचा असेल. यात सुमारे दोन हजार मतदार अपेक्षित आहेत. जुन्नर नगरपालिकेची सदस्य संख्या तीनने वाढली असली, तरी नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागेत वाढ होणार नसल्याचे समजते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ५ व खुल्या वर्गासाठी दहा जागा राहतील. यात महिलांसाठी दहा जागा राखीव असतील.

नगरपालिकेतील सध्याचे बलाबल
लोकनियुक्त नगराध्यक्ष- शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य- ७
शिवसेनेचे सदस्य- ७
आपला माणूस आपली आघाडीचे सदस्य- २
रिक्त- १

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03247 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top