जुन्नरला उद्या बौद्धजन संघातर्फे विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला उद्या बौद्धजन संघातर्फे विविध कार्यक्रम
जुन्नरला उद्या बौद्धजन संघातर्फे विविध कार्यक्रम

जुन्नरला उद्या बौद्धजन संघातर्फे विविध कार्यक्रम

sakal_logo
By

जुन्नर, ता. १४ : जुन्नर तालुका बौद्धजन संघ मुंबई ह्या संस्थेच्या वतीने सोमवारी (ता. १६) भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. नेहरू बाजार जुन्नर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. जुन्नर तालुका बौद्धजन संघ मुंबईचे अध्यक्ष के. बी. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर बौद्धाचार्याच्या उपस्थितीत धम्म पूजा पाठ होणार आहे. बौद्ध धम्माचे अभ्यासक कायदेतज्ज्ञ दादासाहेब रुपवते यांचे बौद्ध धम्म व जागतिक शांतता या विषयावर व्याख्यान होणार आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १६ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03249 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top