व्यावसायिकाची फसवणूकप्रकरणात आठ जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकाची फसवणूकप्रकरणात आठ जणांवर गुन्हा
व्यावसायिकाची फसवणूकप्रकरणात आठ जणांवर गुन्हा

व्यावसायिकाची फसवणूकप्रकरणात आठ जणांवर गुन्हा

sakal_logo
By

व्यावसायिकाची २५ लाखाची फसवणूक
जुन्नर, ता.२१ : बादशहातलाव (ता. जुन्नर) येथील लाहोरकर सेंटरिंग प्लेट्स अँड कन्स्ट्रक्शन मशिनरी दुकानातून गेल्या सहा महिन्यांत आठ जणांनी सेंटरिंगचे सामान भाडेतत्वावर घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावून सुमारे २५ लाख १९ हजाराची फसवणूक केली असल्याची तक्रार पुरवठादार व्यावसायिक तुषार लाहोरकर यांनी केली आहे.
या प्रकरणी बुचकेवाडी येथील अभिजित लक्ष्मण पवार यास अटक करण्यात आली असल्याचे उपनिरीक्षक अमोल पाटील यांनी सांगितले. ३ सप्टेंबर २१ ते १२ मार्च २२ या कालावधीत आठ जणांनी २ हजार ६० सेंटरिंग प्लेट्स तसेच ३७५ लोखंडी जॅक भाडेतत्वावर नेऊन त्याची परस्पर विक्री केली आहे. यात जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील महेश नामदेव डोंगरे ३ लाख ४० हजार, महेश जयराम वाघ २ लाख ८५ हजार,अमोल विलास वाघ व जाधववाडी येथील दयानंद गुलाब जाधव यांनी ३ लाख ७६ हजार, मांजरवाडी-देवाची जाळी येथील सतीश जगन्नाथ मुळे २ लाख ५० हजार,बुचकेवाडी-वैष्णवधाम येथील अभिजित लक्ष्मण पवार ४ लाख ६८ हजार,इंदिरानगर-येडगाव येथील बाळासाहेब कृष्णाजी गावडे २ लाख ५० हजार, व संदीप सुभाष गायकवाड ३ लाख ५० हजार यांनी मिळून २५ लाख १९ हजाराची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03263 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..