नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा
नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा

नवविवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा

sakal_logo
By

जुन्नर, ता. २८ : नवविवाहित मुलीचा सासरी शारीरिक व मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार वडील जयसिंग सदाशिव परदेशी यांनी जुन्नर पोलिसांकडे केली आहे.
सिमरन हिचा पती सोमेश किरण वर्मा, सासू राजेश्वर, सासरे किरण, नणंद जिनल व तिचा पती वृषभ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत मालाड-मुंबई येथे मुलगी सिमरनच्या सासरच्यांनी २७ डिसेंबर २१ ते १ मे २०२२ या लग्नानंतरच्या पाच महिन्यात तिचे अंगावरील ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २५ लाख रुपये रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन फसवणूक केली तसेच आम्हाला ६० लाख रुपये कर्ज आहे. तू वडिलांकडून पैसे घेऊन ये याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी देऊन मारहाण करून खोलीत बंद करून ठेवत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03274 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top