आपटाळे अपघातप्रकरणी टेम्पो चालकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपटाळे अपघातप्रकरणी
टेम्पो चालकाला अटक
आपटाळे अपघातप्रकरणी टेम्पो चालकाला अटक

आपटाळे अपघातप्रकरणी टेम्पो चालकाला अटक

sakal_logo
By

जुन्नर, ता. ४ : आपटाळे-जुन्नर रस्त्यावरील अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पो चालकास जुन्नर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ३) मध्यरात्री ताब्यात घेऊन अटक केली.
या अपघातात शिक्षक नेते भास्कर पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. पानसरे हे बेलसर (ता. जुन्नर) येथे धार्मिक कार्यक्रमास गेले होते. तेथून मोटारसायकलवरून परत येत असताना बेजवाटेजवळ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. त्यानंतर अपघाताची खबर न देता चालक पळून गेला होता. याबाबत कैलास दत्तात्रेय पानसरे (रा. तांबे, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली होती. सुलतान रसूल शेख (रा. तांबे), असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव असून, तो जुन्नरहून आपटाळेकडे जात होता. तर, पानसरे हे जुन्नरकडे येत होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03283 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top