नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे : डॉ. गुंजाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांनी लसीकरण 
करून घ्यावे : डॉ. गुंजाळ
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे : डॉ. गुंजाळ

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे : डॉ. गुंजाळ

sakal_logo
By

जुन्नर, ता. ८ : जुन्नर तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असल्याने संभाव्य चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी केले आहे.
तालुक्यातील ४० हजार ५९६ नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही. ''हर घर दस्तक '' योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन लसीकरण करणार आहेत. नागरिकांनी आपला दुसरा डोस घ्यावा असे डॉ. गुंजाळ यांनी सांगितले.
वडगाव कांदळी येथे कोरोनाचा एक पुरुष रुग्ण (वय ३५) आढळल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव, लग्नसोहळे मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागले असताना कोरोनाने डोके वर काढले आहे. संबंधित कोरोना रुग्ण कोणाच्या संपर्कात आल्याने बाधित झाला याची पडताळणी सुरू असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले.
९ मार्चला तालुक्यात कोरोनाचे शेवटचे दोन रुग्ण सापडले होते. त्यानंतर २६ मार्च रोजी जुन्नर तालुका पूर्णपणे कोरोना मुक्त झाला होता. संपूर्ण कोरोना कालावधीत एकूण २७ हजार १७ जण कोरोना बाधित झाले. यापैकी एकूण २६ हजार ३१७ रुग्ण कोरोनातून बरे झाले. कोरोना निर्बंधातून मुक्त झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असताना आता पुन्हा निर्बंध येतील की काय अशी शंका भेडसावू लागली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03291 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top