जुन्नरमधील इच्छुक लागले तयारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमधील इच्छुक लागले तयारीला
जुन्नरमधील इच्छुक लागले तयारीला

जुन्नरमधील इच्छुक लागले तयारीला

sakal_logo
By

जुन्नर, ता. १३ : जुन्नर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार तयारीला लागले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस व अन्य पक्षांनी स्वबळावर उमेदवार उभे केल्यास निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत.
उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर व मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सोडत काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पापा खोत, गटनेते फिरोज पठाण, समीर भगत, ऋषिकेश जोगळेकर, विनायक गोसावी तसेच इच्छुक उमेदवार, पक्षीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
नगर परिषदेच्या प्रभाग संख्येत दोनने वाढ झाल्याने प्रभागसंख्या दहा व सदस्य संख्येत तीनने वाढून वीस झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा असल्याने प्रत्येक प्रभागात एक महिला याप्रमाणे दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत.
प्रभाग क्रमांक एकमध्ये एक जागा अनुसूचित जमाती महिला व एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक जागा अनुसूचित जाती महिला व एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. प्रभाग क्रमांक ३ ते १० मध्ये एक जागा सर्वसाधारण महिला व दुसरी जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याशिवाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या सोडतींविषयी सूचना व हरकती बुधवार (ता. १५) ते मंगळवार (ता. २१) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात दाखल करता येतील. अंतिम अधिसूचना १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १- अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग २- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण
प्रभाग ३- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ४- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ५- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ६- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ७- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ८- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ९- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १०- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग ११- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १२- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १३- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १४- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १५- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १६- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १७- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १८- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग १९- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण
प्रभाग २०- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03311 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top