हिरडा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिरडा खरेदी केंद्र 
सुरु करण्याची मागणी
हिरडा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

हिरडा खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

sakal_logo
By

जुन्नर, ता. १७ : आदिवासी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक होऊ नये यासाठी राज्य सरकारने आदिवासी विकास महामंडळामार्फत हिरडा खरेदी केंद्र सुरू करावी, अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रश्नाचा पाठपुरावा करावा यासाठी याबाबतचे निवेदन पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याचे किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे व जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी सांगितले.
महामंडळाने आदिवासी कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असणाऱ्या हिरड्याची खरेदी केंद्र मागील चार-पाच वर्षांपासून बंद केली आहे. ही खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावीत यासाठी किसान सभेने घोडेगाव (पुणे) आणि राजूर (नगर) येथे मोर्चे काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यानंतर नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांच्यासमवेत बैठक झाली. हिरडा खरेदीबाबत महामंडळ सकारात्मक आहे. मात्र, महामंडळाचा होणारा तोटा राज्य शासनाने उचलला पाहिजे. यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांसमवेत संघटनेची बैठक घेण्यासाठी महामंडळ पुढाकार घेईल असे सिंगला यांनी सांगितले. परंतु, या बैठकीबाबत अद्याप हालचाल झालेली नाही. पूर्वी स्थानिक व्यापारी दोनशे रुपये प्रती किलोहून अधिक दराने बाळ हिरडा खरेदी करत होते. व्यापाऱ्यांनी संगनमताने गेल्या दोन वर्षांपासून कमी दराने खरेदी सुरु केली असल्याने हिरडा उत्पादकांना तोटा होत आहे. खासगी आणि वन विभाग अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नैसर्गिकरित्या मिळणारे हे उत्पादन म्हणजे आदिवासी कुटुंबांचा आर्थिक कणा होय. आदिवासी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक नियोजन बाळ हिरडा पिकाच्या उत्पादनावर अवलंबून असते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे, विलास साबळे, खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03321 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top