जुन्नरमधील बहुतेक हरकती फेटाळल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमधील बहुतेक हरकती फेटाळल्या
जुन्नरमधील बहुतेक हरकती फेटाळल्या

जुन्नरमधील बहुतेक हरकती फेटाळल्या

sakal_logo
By

जुन्नर, ता. २८ : जुन्नर तालुक्यातील नऊ गट व अठरा गणांच्या रचना निश्चित केल्या आहेत. हरकतीनंतर आळे-पिंपळवंडी गटातील खामुंडी गावाचा समावेश ओतूर-उंब्रज नंबर एक गटात केला आहे. स्थानिक ग्रामस्थांची कोणतीही मागणी नसताना हा बदल झाला असल्याने नागरिकांकडून नाराजीची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यातील नऊ गटांपैकी पाच गटांच्या रचनेबाबत एकूण आठ हरकती नोंदविल्या होत्या, तर हरकतीच्या अर्जावर ६१ जणांच्या सह्या होत्या. पाडळी-येणेरे, डिंगोरे-उदापूर, ओतूर-उंब्रज व राजुरी-बेल्हे या चार गटांसाठी एकही हरकत आली नव्हती, तर पाच गटांसाठी हरकती नोंदविल्या होत्या. त्यातील बहुतेक हरकती फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बदललेल्या गट-गणांमधील गावे

डिंगोरे-उदापूर गट
- उदापूर गण- चिल्हेवाडी, पाचघरवाडी, आंबेगव्हाण, खुबी, खिरेश्वर, सांगनोरे, कोल्हेवाडी, पिंपळगाव जोगे, भोईरवाडी, आळू, कोपरे, जांभूळशी, मांडवे, मुथाळणे, मांदारणे, अहिनवेवाडी, उदापूर.
- डिंगोरे गण- सितेवाडी, वाटखळे, पांगरीतर्फे मढ, कोळवाडी, मढ, डिंगोरे, बल्लाळवाडी, पांगरीतर्फे ओतूर, आलमे, तळेरान, बगाडवाडी, पारगावतर्फे मढ, करंजाळे.

खामगाव- तांबे गट
- खामगाव गण- माणिकडोह, खामगाव, गोद्रे, हडसर, राजुर, उंचखडक, निमगिरी, खटकाळे, खैरे, केवाडी, हिर्डी, जळवंडी, उसरान, खडकुंबे, देवळे, चिंचेचीवाडी, अंजनावळे, घाटघर फांगुळगव्हाण, चावंड, केळी, माणकेश्वर, पूर, शिरोलीतर्फे कुकडनेर.
- तांबे गण- तांबे, सुराळे, तेजूर, आपटाळे, बोतर्डे, हिवरेतर्फे मिन्हेर, शिंदे, वानेवाडी, धालेवाडीतर्फे मिनेर, सोनावळे, घंगाळदरे, सुकाळवेढे, इंगळूण, उच्छिल, शिवली, अंबोली, भिवाडे बुद्रुक, भिवाडे खुर्द, आंबे, पिंपरवाडी,
हातवीज, खानगाव.

पाडळी-येणेरे गट
- येणेरे गण- येणेरे, विठ्ठलवाडी, काले, दातखिळेवाडी, बुचकेवाडी, पारुंडे, विठ्ठलवाडी (वडज), काटेडे, बेलसर, निरगुडे, वडज, चिंचोली, निमगावतर्फे म्हाळुंगे.
- पाडळी गण- पाडळी, बारव, सोमतवाडी, गोळेगाव, अलदरे, हातबन, पिंपळगाव सिद्धनाथ, धामणखेल, कुसूर.

धालेवाडीतर्फे हवेली-सावरगाव गट
- सावरगाव गण- वडगाव सहाणी, पिंपळगावतर्फे नारायणगाव, गुंजाळवाडी, सावरगाव, खिल्लारवाडी, निमदरी, बस्ती, आगर, हापूसबाग, बादशाह तलाव, अमरापूर, खानापूर.
- धालेवाडीतर्फे हवेली गण : आर्वी, कुरण, धनगरवाडी, धालेवाडीतर्फे हवेली, तेजेवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, शिरोली बुद्रुक.

ओतूर-उंब्रज नंबर एक गट
- उंब्रज नंबर एक गण- उंब्रज नंबर एक, डुंबरवाडी, उंब्रज नंबर दोन, धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक, भोरवाडी, विघ्नहरनगर, ओझर, नेतवड, माळवाडी, खामुंडी.
- ओतूर गण- रोहकडी, ओतूर.

आळे-पिंपळवंडी गट
- पिंपळवंडी गण- पिंपरी पेंढार, गायमुखवाडी, नवलेवाडी, जांभूळपट, काळवाडी, पिंपळवंडी, चाळकवाडी, भटकळवाडी, वैशाखखेडे.
- आळे गण- आळे, वडगाव आनंद, पादीरवाडी, आळेफाटा, संतवाडी, कोळवाडी.

राजुरी-बेल्हे गट
- राजुरी गण- राजुरी, उंचखडकवाडी, नळावणे, आणे, आनंदवाडी, पेमदरा, शिंदेवाडी, बांगरवाडी.

- बेल्हे गण- बेल्हे, यादववाडी, कोंबरवाडी, गुळुंचवाडी, गुंजाळवाडी (बेल्हे), तांबेवाडी, रानमळा, साकोरीतर्फे बेल्हे, मंगळरुळ, झाप.

बोरी बुद्रुक-खोडद गट
- बोरी बुद्रुक गण- बोरी बुद्रुक, जाधववाडी, शिरोलीतर्फे आळे, सुलतानपूर, निमगाव सावा, औरंगपूर, पारगावतर्फे आळे, पिंपरी कावळ.
- खोडद गण- येडगाव, भोरवाडी, कांदळी, नगदवाडी, वडगाव कांदळी, बोरी खुर्द, खोडद.

नारायणगाव-वारूळवाडी गट
- नारायणगाव गण- नारायणगाव, बागलोहरे.
- वारूळवाडी गण- वारूळवाडी, मांजरवाडी, हिवरेतर्फे नारायणगाव.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03353 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..