जुन्नरला कृषिदिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला कृषिदिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जुन्नरला कृषिदिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जुन्नरला कृषिदिनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

sakal_logo
By

जुन्नर ता. २ : कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर पंचायत समितीच्या सभागृहात कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी माहिती दिली.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन व भात पिकावरील कीड व रोग यांचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी राज्य सरकारकडून कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला.
आमदार अतुल बेनके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती विशाल तांबे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, कृषी अधिकारी बापू रोकडे, मंडल कृषी अधिकारी लक्ष्मण झांजे, कृषी विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक, व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी केले

कृषिप्रधान जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र शेतीवर अवलंबून असल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या कामाची अपेक्षा आहे.
- अतुल बेनके, आमदार

03996

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03360 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top