कृषीदिनी माणकेश्वरला शेतकऱ्यांकडून वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषीदिनी माणकेश्वरला शेतकऱ्यांकडून वृक्षारोपण
कृषीदिनी माणकेश्वरला शेतकऱ्यांकडून वृक्षारोपण

कृषीदिनी माणकेश्वरला शेतकऱ्यांकडून वृक्षारोपण

sakal_logo
By

जुन्नर, ता.२: कृषी दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागातील माणकेश्वर (ता. जुन्नर) येथील दहा शेतकऱ्यांनी कृषीदिनी ४५१ फळझाडांची रोपे लावून वृक्षारोपण केले.
जागतिक तापमान वाढ, बदलते वातावरण तसेच वृक्ष संवर्धन व संगोपन ही काळाची गरज असल्याचे ओळखून या शेतकऱ्यांनी नारळ, फणस, जांभूळ, चिक्कू, पेरू, तसेच आंब्याच्या हापूस, केशर, पायरी, लंगडा, तोतापुरी, राजापुरी प्रजातीच्या फळझाडांच्या रोपांची शेताच्या बांधावर लागवड केली.पर्यावरण संवर्धनाबरोबर फळबाग लागवडीतुन आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा उद्देशाने वृक्षरोपण केले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वृक्षरोपण करणारे शेतकरी व त्यांनी लावलेल्या रोपांची संख्या पुढीलप्रमाणे : रामचंद्र मुक्ताजी कोरडे-२००, रोहिदास कोंडीभाऊ कोरडे -८५, धर्मा मुक्ताजी कोरडे-५०, कोंडीभाऊ सीताराम बांबळे-३०, सागर जाणकू लांडे-३०, बाळू कोंडीभाऊ कोरडे-२५, धर्मा शिवराम मुठे-२५,बाळू जाणकू कोरडे-१०, रामदास श्रावण लांडे-०६.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03361 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top