नियंत्रित भात लागवड करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियंत्रित भात लागवड करा
नियंत्रित भात लागवड करा

नियंत्रित भात लागवड करा

sakal_logo
By

जुन्नर, ता. १९ : शेतकऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रित भात लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी केले.
जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात गेल्या आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे भात रोपवाटिका पाण्यात बुडाल्यामुळे भातरोपाचं नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये भात लागवड करताना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी भात लागवड करताना नियंत्रित लागवड करावी म्हणजे २५ बाय १५ ऐवजी २५ बाय २५ वर लागवड करावी. दोरीचा वापर करून अचूक लागवड करावी. भात लागवड करताना एका चुडामध्ये शेतकरी चार ते आठ रोपे लावतात त्याऐवजी एका चुडामध्ये दोन ते तीन रोपे लावावीत म्हणजे पुढील काळात चांगले फुटवे फुटून उत्पादन भरपूर येते. शेतकऱ्यांनी युरियाचा वापर शिफारशीनुसारच करावा. अतिरिक्त युरिया वापरू नये तसेच प्रति एकरी ६८ किलो युरिया ब्रिकेट म्हणजेच गोळी खत वापरावे.
सर्वप्रथम भात खाचरामधील अतिरिक्त पाणी काढून द्यावे. रोपवाटिकेतील रोपे पाण्यात बुडणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोपवाटिकेतील रोपे पिवळी पडली असतील तर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा आळवणी करावी तसेच कार्बनडझियमची या रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी करावी व सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ व कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03409 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..