आदिवासी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
आदिवासी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

आदिवासी शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

sakal_logo
By

जुन्नर, ता.२६ : येथील माजी आमदार कृष्णराव मुंढे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ‌शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विक्रम मुंढे यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील कातकरी वस्ती-पाडळी, राजूर नंबर दोन, हडसर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी उपसरपंच कलाबाई दावघट, दगडू वाघ पारधी, पडवळ, प्रतिष्ठानचे सदस्य जानकु बोऱ्हाडे, सावळेराम भालचिम, नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंद जोशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


04110

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03421 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..