ओबीसी आरक्षणाची आज जुन्नर नगर परिषदेत सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी आरक्षणाची आज
जुन्नर नगर परिषदेत सोडत
ओबीसी आरक्षणाची आज जुन्नर नगर परिषदेत सोडत

ओबीसी आरक्षणाची आज जुन्नर नगर परिषदेत सोडत

sakal_logo
By

जुन्नर, ता. २७ : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुन्नर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण राखीव जागांसाठी गुरुवारी (ता. २८) आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात येणार आहे.
जुन्नर नगर परिषदेची प्रभाग संख्या दहा व सदस्य संख्येत वीस झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा असल्याने प्रत्येक प्रभागात एक महिला याप्रमाणे दहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक एकमध्ये एक जागा अनुसूचित जमाती महिला, तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. उर्वरित अठरा जागांमधून नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या पाच राखीव जागांपैकी तीन महिलांसाठी व उर्वरित पाच सर्वसाधारण महिलांचे आरक्षण व सर्वसाधारण वर्गासाठीचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या सोडतींविषयी सूचना व हरकती शुक्रवार (ता. २१) ते सोमवार (ता. १) दुपारी ३ वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात दाखल करता येतील. त्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03424 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..