
गणांच्या आरक्षणाची आज जुन्नरला सोडत
जुन्नर, ता. २७ : जुन्नर तालुका पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत गुरुवारी (ता. २८) काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे याच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन केल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीच्या १८ गणांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षणासह राखून ठेवण्यात येणाऱ्या जागांची सोडत काढण्यात येणार आहे. अनुसूचित जातीसाठी एक जागा असून, ती महिला राखीव आहे. अनुसूचित जमातीच्या चार जागांपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या चार जागा असून, दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण नऊ जागांपैकी चार जागा महिलांसाठी राखीव आहेत. आरक्षणाचे प्रारूप २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03425 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..