जुन्नरमध्ये अठरा गणांसाठी सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये अठरा गणांसाठी सोडत
जुन्नरमध्ये अठरा गणांसाठी सोडत

जुन्नरमध्ये अठरा गणांसाठी सोडत

sakal_logo
By

जुन्नर, ता.२८ : जुन्नर तालुका पंचायत समितीच्या १८ गणांच्या आरक्षण सोडत गुरुवारी (ता. २८) काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी मागील चार निवडणुकांचे आरक्षणानुसार चक्रानुक्रमे प्राधान्य क्रमानुसार निश्चिती केली.
पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षणाची घोषणा करण्यात आली. तहसीलदार रवींद्र सबनीस, मंडल अधिकारी सुधीर वाघमारे आणि राजकीय पक्षाचे इच्छुक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील अनुसूचित जाती एक जागा महिला, अनुसूचित जमाती ४ जागांपैकी दोन महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ४ जागांपैकी २ महिला व सर्वसाधारण ९ जागांपैकी ४ महिला, अशा प्रकारे १८ जागांचे गणनिहाय आरक्षण यावेळी जाहीर केले.

गणनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :
उदापूर- सर्वसाधारण
डिंगोरे- सर्वसाधारण महिला
खामगाव- सर्वसाधारण
तांबे- सर्वसाधारण
येणेरे- सर्वसाधारण
पाडळी- अनुसूचित जमाती महिला
सावरगाव- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
धालेवाडीतर्फे हवेली- अनुसूचित जाती महिला
उंब्रज नंबर एक- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
ओतूर- सर्वसाधारण
पिंपळवंडी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
आळे- अनुसूचित जमाती महिला
राजुरी- सर्वसाधारण महिला
बेल्हे- अनुसूचित जमाती
बोरी बुद्रुक- अनुसूचित जमाती
खोडद- सर्वसाधारण महिला
नारायणगाव- सर्वसाधारण महिला
वारूळवाडी- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03426 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top