जुन्नर नगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर नगरपालिकेसाठी 
आरक्षण सोडत जाहीर
जुन्नर नगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

जुन्नर नगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर

sakal_logo
By

जुन्नर ता. २८ : जुन्नर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २८) आरक्षण सोडत नगर परिषदेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर व मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे ही सोडत काढण्यात आली. बाळासाहेब भोसले यांनी सहकार्य केले.
यापूर्वी काढण्यात आलेल्या अनुसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिला हे आरक्षण तसेच ठेवून उर्वरित नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. जुन्नर नगर परिषदेत एकूण १० प्रभागात २० सदस्य असणार आहेत. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.

नगराध्यक्ष सोडतीकडे लक्ष
सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या समावेशाने काही प्रभागात सर्वसाधारण गटाच्या इच्छुकांच्या आशा मावळल्या, तर नगराध्यक्ष थेट जनतेतून होणार असल्याने आता लक्ष नगराध्यक्ष सोडतीकडे लागले आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक १ : अ- अनुसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २ : अ- अनुसूचित जाती महिला, २ ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ : अ- सर्वसाधारण महिला, ३ ब- सर्वसाधारण, प्रभाग ४ : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग ५ : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ : अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग ७ : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ : अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग ९ : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १० : अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03427 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..