विझिटिंग फेलोशिपसाठी सोमनाथ निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विझिटिंग फेलोशिपसाठी सोमनाथ निवड
विझिटिंग फेलोशिपसाठी सोमनाथ निवड

विझिटिंग फेलोशिपसाठी सोमनाथ निवड

sakal_logo
By

जुन्नर,ता. २ : हातवीज (ता.जुन्नर) येथील सोमनाथ निर्मळ याची इंटरनॅशनल विझिटिंग फेलोशिप अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे (युरोप) येथे संशोधन अभ्यासासाठी निवड झाली आहे. सोमनाथ येत्या १० ऑगस्टला नॉर्वेसाठी रवाना होणार आहे. तेथे तीन महिने चाईल्ड हुड वेलफेअर अँड कल्चर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहे.
दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी कुटुंबातील सोमनाथने प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटांवर मात करत नॉर्वे देशापर्यंत मजल मारली आहे. सध्या सोमनाथ पुणे विद्यापीठात प्रा.श्रुती तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ''महाराष्ट्रातील आदिवासींचे उच्च शिक्षण: धोरणे व साह्यकारी व्यवस्था''विषयावर पीएचडी करत आहे.
सोनावळे येथील शासकीय आश्रमशाळेत सोमनाथने दहावीमध्ये प्रथम आला होता. श्री शिव छत्रपती महाविद्यालयात शिकत असताना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेशी त्याचा संबंध आला. फी वाढ, वसतिगृहाच्या प्रश्नांवर आंदोलने करत सोमनाथने बारावीला कला शाखेत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच एनएसएसमध्ये बेस्ट स्टुडंट्स अवार्ड, पदव्युत्तर पदवी घेत प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी ''सेट'' ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन नॅशनल फेलोशिप फॉर शेड्युल ट्राईब स्टुडंटस मिळवत सध्या पीएचडी करत आहे. सध्या सोमनाथ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा केंद्रीय समिती सदस्य व राज्य उपाध्यक्ष आहे. सोमनाथच्या निवडीबद्दल वडील गोविंद निर्मळ, आई आनाबाई यांना आनंद झाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

04128

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03434 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..