जुन्नरमध्ये आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pushed police
जुन्नरमध्ये आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की

जुन्नरमध्ये आरोपीकडून पोलिसांना धक्काबुक्की

जुन्नर - पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी तुषार कान्हू मुंडे (रा. बारव, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. याबाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी अभिमन्यू सुरेश मोटे यांनी दिली.

आरोपी मुंडे याने शनिवारी (ता. ६) सांयकाळी एका महिलेला हातवारे करून तिचा पाठलाग करत तिची ओढणी ओढली होती. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुंडे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी महिलेच्या पतीसह पोलिस कर्मचारी त्याला शोधण्यासाठी गेले होते.

त्यावेळी त्याने महिलेच्या पतीस हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी पोलिस त्याला बाजूला करत असताना त्याने, ‘तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही,’ असे म्हणून मोठमोठ्याने शिवीगाळ दमदाटी करून सरकारी गणवेशाच्या शर्टाची कॉलर पकडून, ओढून, धक्काबुक्की केल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचे आरोपावरून गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03445 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..