नावाला काळे फासल्याचा लांडे समर्थकांकडून निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नावाला काळे फासल्याचा 
लांडे समर्थकांकडून निषेध
नावाला काळे फासल्याचा लांडे समर्थकांकडून निषेध

नावाला काळे फासल्याचा लांडे समर्थकांकडून निषेध

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : आदिवासी भागातील एसटीच्या बसथांब्यांवरील पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नावाला काळे फासल्याचा लांडे समर्थकांनी तीव्र निषेध केला. जुन्नर तालुका पंचायत समिती कार्यालय आवारात लांडे समर्थकांनी एकत्र येत आदिवासी बांधवांच्या वतीने भाषणातून जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी आमदार अतुल बेनके यांनी थांब्यावर लांडे यांचे नाव राहील याची लांडे समर्थकांना ग्वाही दिली.
लांडे यांनी अध्यक्ष असताना आदिवासी भागात एसटीचे ४२ बसथांबे बांधले होते. त्यामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना उन्हाळा व पावसाळ्यात उपयोग होत होता. वीस वर्षांपूर्वी या थांब्यावर त्यांचे नाव होते.
या थांब्याच्या दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी गेल्या वर्षी निधी मंजूर झाला होता. यातून थांब्याची आवश्यक दुरुस्ती व रंगरंगोटी केला. त्यावर ‘देवराम लांडे यांचे विशेष प्रयत्नातून’ असे मोठ्या अक्षरात नाव टाकण्यात आले होते. त्यास आदिवासी भागातील काही पुढाऱ्यांनी काळे फासले.
जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे कृत्य केल्याने लांडे समर्थक याचा निषेध करण्यासाठी जमले होते. यावेळी रामा भालचिम, लहू बोऱ्हाडे, कमा साबळे, सोपान जोशी, नावजी घोयरत व महिलांनी भाषणे करून निषेध व्यक्त केला. उपस्थित समर्थकांना आमदार बेनके यांनी बस थांब्यावरील लांडे यांचे नाव राहील, अशी ग्वाही दिली. तसेच, नाव कसे टाकावे याबाबत व विद्रुपीकरण केल्याबद्दल पंचायत समितीचे अधिकारी निर्णय घेतील, असे सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03451 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..