पोलिस दौडमध्ये ७२ जणांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस दौडमध्ये ७२ जणांचा सहभाग
पोलिस दौडमध्ये ७२ जणांचा सहभाग

पोलिस दौडमध्ये ७२ जणांचा सहभाग

sakal_logo
By

जुन्नर, ता. १४ : जुन्नर उपविभागातील नारायणगाव, आळेफाटा, ओतूर व जुन्नर पोलिस ठाण्याचे प्रभारी व दुय्यम अधिकारी तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१२) दहा किलोमीटर अंतराची पोलिस दौड पूर्ण केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांनी दिली. या दौडीमध्ये पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह ६० पुरुष व १२ महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली किल्ले शिवनेरी पायथा ते वडज धरण जलाशय अशी दुहेरी दौड आयोजित करण्यात आली होती. यात पुरुष गटात नीलेश चव्हाण, राजेंद्र देवकाते व संतोष पर्वते व महिला गटात रूपाली मिंढे, निकिता जेजुरकर व मोनिका अरगडे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले.

04173

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03459 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..