जुन्नरला कलात्मक पिंडींच्या दर्शनास गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला कलात्मक पिंडींच्या दर्शनास गर्दी
जुन्नरला कलात्मक पिंडींच्या दर्शनास गर्दी

जुन्नरला कलात्मक पिंडींच्या दर्शनास गर्दी

sakal_logo
By

जुन्नर ता.२२ : शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन पंचलिंग शिवालयातील शिवलिंगाचे तसेच तांदळाच्या कलात्मक पाच पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आज शेवटच्या श्रावणी सोमवारी (ता. २२) सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाच्या प्रतिकात्मक मुखवट्याच्या मस्तकाच्या शिरेतून तांदळाच्या एकावर एक अशा पाच पिंडी लिंबाच्याआधारावर बनवून ठेवल्या जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात पाच स्वयंभू शिवलिंगे आहेत. कळसावर ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी या देवतांची विविध रूपे आहेत. एकूण तीन टप्प्यात लहान-मोठे १०१ कळस आहेत. मंदिरात लक्ष्मीनारायण, गणपती व पार्वती यांच्या मूर्ती आहेत मंदिराच्या दक्षिणेला भुयारी विहीर असून, त्यामधून बारा महिने गोमुखातून पुष्करणीमध्ये पाण्याचे धार वाहत असते. भाविकांना मंदिरात हात पाय धुवून जाण्यासाठी छोटेसे कुंडी आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केले आहे. मंदिर व परिसर विकासासाठी माजी नगराध्यक्ष रावसाहेब ऊर्फ अनाजी धोंडजी पाटील ट्रस्ट काम करत आहे. दर श्रावणी सोमवारी बेलाची पाने, सुवर्ण बेलपत्र, पिंडीसाठी लागणारा तांदूळ याची व्यवस्था तसेच परंपरेने कुस्त्याचा आखाडा बुट्टे पाटील कुटुंबीय पिढ्यानपिढ्या पाहत आहे.
जुन्नर शहरातून मंदिराकडे जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर दुतर्फा १८९० मध्ये आनाजी बुट्टे पाटील यांनी सावलीसाठी वृक्षारोपण केले आहे. याची सनद बुट्टे पाटील कुटुंबास शासनाने दिली आहे.
येथील अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने श्रावणी सोमवारी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खिचडी व दूध वाटप करण्यात आले.


04220

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03486 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..