एस.एफ.आय.जिल्हाध्यक्षपदी अविनाश गवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस.एफ.आय.जिल्हाध्यक्षपदी अविनाश गवारी
एस.एफ.आय.जिल्हाध्यक्षपदी अविनाश गवारी

एस.एफ.आय.जिल्हाध्यक्षपदी अविनाश गवारी

sakal_logo
By

जुन्नर, ता. २४ : येथील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस. एफ. आय.) च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी अविनाश गवारी व सचिवपदी नवनाथ मोरे यांची निवड झाली.

जुन्नर येथे आदिवासी समाज प्रबोधिनीच्या सभागृहात संघटनेचे तीन दिवसांचे जिल्हास्तरीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकारी निवडण्यात आले. यावेळी प्रतिनिधी सत्रात संघटनेच्या मागील तीन वर्षांच्या अहवालावर चर्चा होऊन तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या सत्रामध्ये शंभर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. यावेळी नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात लढा तीव्र करा, आदिवासी व समाजकल्याण वसतिगृहे, तसेच आश्रमशाळांतील प्रश्नांना घेऊन लढा तीव्र करा, नोकर भरती तत्काळ सुरू करा आदी ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

नवीन जिल्हा समितीचे पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे- कोषाध्यक्ष- बाळकृष्ण गवारी, सहसचिव- प्रवीण गवारी, समीर गारे, उपाध्यक्ष- रूपाली खमसे, अक्षय निर्मळ. सचिव मंडळ सदस्य- दीपक वाळकोळी, अक्षय घोडे, अक्षय साबळे. जिल्हा समिती सदस्य संदीप मरभळ, राजू शेळके, विलास साबळे, कांचन साबळे, निशा साबळे, भूषण पोकळे, रोहिदास फलके, योगेश हिले, रोशन पेकरी, भार्गवी लाटकर, अभिषेक शिंदे, गणेश जानकथ, सचिन साबळे, रवी साबळे.
एसएफआय चे माजी राज्य सरचिटणीस डॉ. महारूद्र डाके यांचे भाषण झाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..