सरपंच व सदस्य उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरपंच व सदस्य उमेदवारी 
अर्ज स्वीकारण्यास सुरवात
सरपंच व सदस्य उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात

सरपंच व सदस्य उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरवात

sakal_logo
By

जुन्नर, ता. २५ : तालुक्यामधील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास बुधवार (ता. २४) पासून सुरवात झाली आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत असून एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या १०९ प्रभागातील २८६ सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज (ता. १) सप्टेंबर पर्यत दाखल करता येणार आहेत पण पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र शनिवार ते सोमवार (ता. २७, २८, ३१) ऑगस्टला शासकीय सुट्ट्या असल्याने अर्ज दाखल करता येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी २ सप्टेंबरला होणार असून ता. ६ सप्टेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान (ता. १८) सप्टेंबरला सकाळी (७.३० ते सायंकाळी.५.३०), मतमोजणी (ता. १९) सप्टेंबरला होणार आहे.
ग्रामपंचायती व सदस्य संख्या पुढील प्रमाणे :- मढ-९, खुबी-९, कोपरे-७, तळेरान-९, सीतेवाडी-९, घाटघर-७, अंजनावळे-९, जळवंडी-७, उंडेखडक-७, राजुर-७, चावंड-९, पूर-७, अंबोली-७, आपटाळे-७, खानगाव-७, घंगाळदरे-७, तांबे-९, मांडवे-९, पिंपळगावजोगा-११, पारगाव तर्फे मढ-७, देवळे-९ हडसर-९, गोद्रे-९, उच्छिल-९, तेजुर-७, इंगळूण-७, भिवाडे बुद्रूक-७, सोनावळे-७, सुराळे-७, केवाडी-७, चिल्हेवाडी-७, माणिकडोह-७, दातखिळवाडी-७, उंब्रज नंबर दोन-९, येणेरे-९, मंगरूळ-९.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03495 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..