जुन्नररमध्ये दिव्यांगांना ऑनलाइन प्रमाणपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नररमध्ये दिव्यांगांना ऑनलाइन प्रमाणपत्र
जुन्नररमध्ये दिव्यांगांना ऑनलाइन प्रमाणपत्र

जुन्नररमध्ये दिव्यांगांना ऑनलाइन प्रमाणपत्र

sakal_logo
By

जुन्नर, ता.२७ : श्री राधेश्याम दिव्यांग संस्थेने जुन्नर तालुक्याच्या दुर्गम भागातील वाड्या वस्त्यातील दिव्यांगांना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून दिले. कोपरे, मांडवे, आंबे, हातविज, घाटघर परिसरात सुमारे ३५ दिव्यांग ऑनलाइन प्रमाणपत्र व शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचे आढळून आले. विविध शासकीय योजनाची माहिती
देऊन त्यांची नोंदणी करण्यात आली.

विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या दिव्यांगांना प्रहार जनशक्ती रुग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केद्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण, अरुण शेरकर व कार्यकर्त्यांनी दुर्गम भागातील गावागावात जावून माहिती घेतली.
पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय तसेच मंचर ग्रामीण रुग्णालयात दिव्यांगांना तपासणीसाठी घेऊन जाण्याची व्यवस्था केली. या सर्वांची एकाच दिवशी तपासणी करून त्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळून देण्यात आले. यासाठी औंध जिल्हा रुग्णालय व मंचर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी प्रहार जनशक्तीचे दीपक चव्हाण,अध्यक्षअरूण शेरकर, कार्याध्यक्ष दत्तात्रेय हिवरेकर,गणेश गुंजाळ,श्रीकांत जाधव, सत्यवान साळवे,तबाजी आरोटे,भानुदास घोलप आदी कार्यकर्ते, दिव्यांग बांधव व पालक उपस्थित होते.
04246

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03501 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..