जुन्नरमध्ये ५९ टक्के केवायसी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये ५९ टक्के केवायसी पूर्ण
जुन्नरमध्ये ५९ टक्के केवायसी पूर्ण

जुन्नरमध्ये ५९ टक्के केवायसी पूर्ण

sakal_logo
By

जुन्नर, ता.२९ : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी जुन्नर तालुक्यातील ५९, ७६५ शेतकऱ्यांपैकी ३५ हजार ४८८ लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण सुमारे ५९ टक्के इतके आहे. अद्याप २४ हजार २७७ शेतकऱ्यांनी केवायसी करणे बाकी आहे. हे प्रमाण ४१ टक्के इतके आहे. तालुक्यात तीन हजार ६७५ अपात्र लाभार्थी आहेत.

केवायसी न केल्यास बारावा हप्ता मिळण्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांना केवायसी करण्यासाठी ३१ ऑगस्ट वाढीव मुदत दिल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. केंद्र शासन पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठ हजार रुपये अनुदान देते. यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले यात काही आयकर भरणाऱ्या व अपात्र शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्याचे आढळून आल्यानंतर या प्रकाराची चौकशी करण्यात आली व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून रकमा वसूल करून घेण्यात आल्या मात्र अद्यापही काही अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे भरण्यात आले नाहीत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल ओटीपीद्वारे व अंगठा लावून केवायसी करावी यासाठी ३१ मे पर्यंत दिलेली मुदत ३१ ऑगस्ट करण्यात आली. अकरावा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर सोडण्यात आला परंतु तालुक्यात अजूनही शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने केवायसी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक मार्फत गावोगावी दिल्या असून, शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ३१ ऑगस्ट पर्यंत केवायसी करून घ्यावी. अन्यथा बारावा हप्ता न मिळाल्यास या योजनेतून नाव कमी होण्यास ते जबाबदार राहतील असे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील १८४ गावांपैकी १८० गावातील शेतकऱ्यांच्या केवायसी करणे बाकी आहे.

केवायसी बाकी असणारी गावे
आळे, आणे, बल्लाळवाडी, बेल्हे, भटकळवाडी, भोरवाडी, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द, चाळकवाडी, चिंचोली, धोलवड, डिंगोरे हिवरे बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरे तर्फे नारायणगाव, काळवाडी, कांदळी, खामगाव, खामुंडी, खोडद, कुसूर, मांजरवाडी, नळवणे, नारायणगाव, निमगाव सावा, ओतूर, पारगाव तर्फे आळे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पिंपळवंडी, पिंपरीपेंढार,राजुरी,साकोरे तर्फे बेल्हे,सावरगाव, शिंदेवाडी,सुलतानपूर,उदापूर,उंब्रज नंबर एक,वडगाव कांदळी, वडगावआनंद, वारुळवाडी,येडगाव,येणेरे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03504 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..