जुन्नरमध्ये पावसामुळे शेतीचे पुन्हा नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये पावसामुळे
शेतीचे पुन्हा नुकसान
जुन्नरमध्ये पावसामुळे शेतीचे पुन्हा नुकसान

जुन्नरमध्ये पावसामुळे शेतीचे पुन्हा नुकसान

sakal_logo
By

जुन्नर, ता. ८ : जुन्नर तालुक्याला बुधवारी (ता. ७) पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. नऊ मंडल विभागातील पर्जन्यमापन केंद्रावर गेल्या २४ तासांत ८०६ मिलिमीटर; तर सरासरी ८९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने वडज, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगे धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नद्यांना पूर आला आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर्व भागात मातीचे बंधारे-रस्ते वाहून गेले.
तालुक्यात ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असताना पुन्हा बुधवारी देखील अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

मंडलनिहाय पडलेला एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : जुन्नर- ९४, नारायणगाव- ७८,ओतूर-७२, वडगाव आनंद- ७६, बेल्हे- ७३, निमगाव सावा- ७१, डिंगोरे- ९६, आपटाळे- ११२, राजूर- १३४.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03537 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..