जुन्नरला चार गावांचे सरपंचपद बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला चार गावांचे 
सरपंचपद बिनविरोध
जुन्नरला चार गावांचे सरपंचपद बिनविरोध

जुन्नरला चार गावांचे सरपंचपद बिनविरोध

sakal_logo
By

जुन्नर, ता. ८ : जुन्नर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ५७ जणांनी माघार घेतल्याने १२७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील सुराळे, तेजूर, माणिकडोह व खानगाव या चार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकच अर्ज राहिल्याने येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.
मढ, घाटघर, आपटाळे, उंडेखडक, हडसर, भिवाडे बुद्रुक, इंगळूण, मंगरूळ, चिल्हेवाडी, दातखिळवाडी व आपटाळे या ११ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सरळ लढत होत आहे. सरपंचपदासाठी सर्वाधिक उमेदवार खुबी- १०, तळेरान ९, अंजनावळे- ८, जळवंडी व उच्छिल प्रत्येकी- ७ व आंबोली- ६ या गावांत आहेत. मतदान १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत होणार आहे. मतमोजणी १९ सप्टेंबर रोजी होईल.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03538 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..