जुन्नरला निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला निर्माल्यापासून 
सेंद्रिय खत निर्मिती
जुन्नरला निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती

जुन्नरला निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती

sakal_logo
By

जुन्नर, ता. ११ : गणेशोत्सव काळात जमा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मनोज पष्टे व आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री यांनी सांगितले.
जुन्नर नगर पालिकेने कुकडी नदी तीरावर विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था केली होती. गणेशोत्सव काळात सुमारे दहा टन निर्माल्य गोळा करण्यात आले. खतयोग्य निर्माल्यापासून खत तयार करून त्याची विक्री करण्यात येणार आहे. कुकडी नदी किनारी असलेल्या सहा घाटांवर जुन्नर शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी नगर पालिकेमार्फत घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीतून येथील सर्व निर्माल्य गोळा करून कचरा डेपोत नेण्यात आले असून तेथे खतनिर्मितीसाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
जुन्नर शहर व परिसरातील गणेश विसर्जन हे थेट कुकडी नदीत होत असते. यामुळे होणारे नदी प्रदूषण टाळण्यासाठी प्रभागनिहाय कृत्रिम हौद उपलब्ध करून दिल्यास प्रदूषण रोखण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03543 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..