खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध जुन्नरला गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध 
जुन्नरला गुन्हा दाखल
खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध जुन्नरला गुन्हा दाखल

खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध जुन्नरला गुन्हा दाखल

sakal_logo
By

जुन्नर, ता. १७ : पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व तत्काळ मदत उपलब्ध होण्याच्या हेतूने सुरू केलेल्या ११२ नंबरवर फोन करून दिशाभूल करणारी खोटी माहिती दिल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन स्थितीत अथवा संकटाच्या वेळी ११२ हा नंबर डायल केला असता सदर व्यक्तीला तातडीने मदत उपलब्ध होते. शुक्रवारी (ता. १६) रोजी जुन्नर पोलिस ठाण्यात मोबाईल क्रमांक ९५५२९७६८८५ वरून एका अज्ञात व्यक्तीने मी घोगरेवाडी-सुराळे (ता. जुन्नर) येथील रहिवासी असून आमच्या येथे खूप सारे लोक नदीत वाहून गेले असून त्यात माझा भाऊ देखील आहे व आम्हाला मदत हवी आहे अशा आशयाचा फोन केला.
या परिसरात जोराचा पाऊस झाल्याने मीना नदीला पूर आला होता. अज्ञात व्यक्तीने कळवलेली घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी तातडीने मदतीसाठी रवाना झाले. सदर ठिकाणी जाऊन स्थानिक नागरिक व पोलिस पाटील यांना घटनेची माहिती विचारली असता ही बाब खोटी असून अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही असे सांगण्यात आल्याने ११२ क्रमांकावर खोटा व दिशाभूल करणारा फोन केल्याचे सिद्ध झाल्याने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जुन्नर पोलिस ठाण्यात कलम १७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03560 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..