ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी
जुन्नर तालुक्यात आज मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात आज मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जुन्नर तालुक्यात आज मतदान

sakal_logo
By

जुन्नर, ता. १७ : जुन्नर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी रविवारी (ता. १८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (ता. १९) होईल.
तालुक्यातील खानगाव, तेजूर व माणिकडोह या तीन ग्रामपंचायती आणि सुराळे, तेजूर, माणिकडोह व खानगाव या चार ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे सरपंचपदाच्या ३२ जागांसाठी १२७ उमेदवार; तर ३३ ग्रामपंचायतीच्या १०० प्रभागातील १०९ सदस्यांसाठी २९१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी २० हजार ५४० महिला व २१ हजार ५१४ पुरुष, असे एकूण ४२ हजार ५४ मतदार आहेत. शंभर मतदान केंद्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्त केली आहे. संवेदनशील ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
मढ, घाटघर, आपटाळे, उंडेखडक, हडसर, भिवाडे बुद्रुक, इंगळूण, मंगरूळ, चिल्हेवाडी दातखिळवाडी व आपटाळे या ११ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी सरळ लढत होत आहे. सरपंचपदासाठी सर्वाधिक उमेदवार खुबी- १०, तळेरान- ९, अंजनावळे- ८, जळवंडी व उच्छिल- ७ व आंबोली- ६ या गावात आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03561 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..