जुन्नर शहरातील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर शहरातील पिंजऱ्यात  
बिबट्याची मादी जेरबंद
जुन्नर शहरातील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद

जुन्नर शहरातील पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद

sakal_logo
By

जुन्नर, ता. २२ : जुन्नर शहरातील आगर पेठ परिसरात संचार करणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात जुन्नर वन विभागाला यश आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.
बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्नर शहरातील भाग असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वन विभागाने गणपती उत्सवात येथील पडीक जागेत पिंजरा लावला होता. बुधवारी (ता. २१) सकाळी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे समजल्याने पेठेतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान, बिबट्याच्या दर्शनामुळे स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते राज जाधव यांच्या माध्यमातून वन विभागाकडे पिंजरा लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. वनक्षेत्रपाल नितीन विधाटे, वनरक्षक नारायण राठोड, संतोष भालेकर, संजय गायकर व स्वरूप रेंगडे यांनी ही कारवाई केली. पिंजऱ्यात सापडलेली बिबट्याची तीन वर्षे वयाची पूर्ण वाढ झालेली मादी आहे. माणिकडोह निवारा केंद्रात तिची रवानगी केल्याचे वनपाल विधाटे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03565 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..