सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलिसांकडून आरोपी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेस्टाईल पाठलाग करीत
पोलिसांकडून आरोपी जेरबंद
सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलिसांकडून आरोपी जेरबंद

सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलिसांकडून आरोपी जेरबंद

sakal_logo
By

जुन्नर, ता. ३० : खुनी हल्ल्यातील फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलिसांच्या तपास पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करत खेड-शिवापूर येथे एका प्रवासी बसमधून ताब्यात घेतले.

शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील फरारी आरोपी अक्षय मोहन बोऱ्हाडे (वय २७) त्याचे साथीदार सुदर्शन शिवाजी विधाटे (वय २६) व विजय प्रकाश बोचरे (वय २९) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

जुन्नर येथील सुखप्रदा वडापाव सेंटरच्या गाडीवर शनिवार (ता. २४) रोजी संतोष शंकर खोत काम करत असताना अक्षय बोऱ्हाडे व त्याचे सात-आठ साथीदार आले. जुन्या भांडणातून दमदाटी करत अक्षयने चाकूने मारण्याचा प्रयत्न करताना संतोषच्या मानेला जखम झाली. तो खाली पडल्यावर अन्य साथीदारांनी गळ्यातील सोन्याची पाच तोळ्यांची चेन व गल्ल्यातील सात हजार रुपये घेऊन पळून गेले होते. याबाबत संतोष खोत याने फिर्याद दाखल केली होती.

गुन्ह्यातील आरोपी कोल्हापूर येथे असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलिसांचे संयुक्त पथक कोल्हापूरला आरोपीला पकडण्यासाठी निघाले असता आरोपी साताऱ्याहून पुण्याकडे येत असल्याचे समजले. आरोपी प्रवास करत असलेल्या प्रवासी बसचा पाठलाग करीत पहाटेच्या सुमारास खेड-शिवापूरच्या हद्दीत तीनही आरोपींना ताब्यात घेतले.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मागदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक शेळके, विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, गणेश जगदाळे, पोलिस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अमोल शिंदे, किशोर जोशी यांनी ही कारवाई केली.
------------------------------------